अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 11 नोव्हेंबर रोजी आपला आशियाई दौरा सुरू करणार असून, या दरम्यानच ते अफगाणिस्तान बाबत अमेरिकेच्या आगामी धोरणाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
या दौऱ्यापूर्वी ओबामा आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता सरकारने फेटाळून लावली असून, यानंतरच ते अफगाणिस्तान विषयी बोलणार असल्याचे ओबामांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे.
अफगाणिस्तानात परिस्थिती बिघडत असल्याचे सांगत अतिरिक्त सैन्य पाठवण्याची मागणी नाटो प्रमुख जनरल मॅक्रिस्टल यांनी केली आहे.