पाकिस्तानच्या लांडीकोटल भागात झालेल्या शक्तिशाली स्फोटात सात सैनिक ठार झाले. अफगाणिस्तान सीमेलगत हा भाग येतो.
या स्फोटात काही सैनिक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर या भागात जोरदार धुमश्चक्री सुरू आहेत. यानंतर पाक सैन्याने केलेल्या हवाई कारवाईत 13 दहशतवादी मारले गेले.
पाक सैन्याने वझीरिस्तान भागात मोठे अभियान सुरू केले असून, यात आतापर्यंत 264 दहशतवादी तर पाक सैन्यातील 33 सैनिक मारले गेले आहेत.