चीनच्या शांक्सी प्रांतात झालेल्या भीषण अपघातात 13 ठार तर 41 जण गंभीर जखमी झालेत. जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेबई प्रांताकडून ताययुवानकडे जाणारी बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला होता. बसमध्ये 54 प्रवासी होते. अपघात इतका भीषण होता की 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.