पाकिस्तानातील अराजकतेच्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांना पाकिस्तान न जाण्याचा सल्ला दिल्यानंतरही गुरूनानक जयंतीनिमित्त सुमारे दीड हजार भारतीय भाविक आज पाकमध्ये दाखल झाले.
पाकिस्तानच्या ‘शरणार्थी न्यास संपत्ती बोर्ड’चे उपनिर्देशक फराज अब्बास यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार पहिल्या विशेष रेल्वेने सुमारे 1,500 तीर्थयात्री पाकमध्ये आले असून दुस-या ट्रेनने आणखी किमान 200 तीर्थयात्रेकरू येण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, पाकिस्तानी अधिका-यांनी भारतीय अधिका-यांकडे विशेष गाड्यांना सीमेपलीकडे येण्याची परवानगी मागितली होती. मात्र भारतीय रेल्वेने त्यास सुरक्षा कारणांमुळे परवानगी नाकारली होती.