आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » राणाच्या घरी सापडल्या लादेनच्या व्हिडीओ टेप्स (FBI finds al Qaeda videos in Rana's house)
Feedback Print Bookmark and Share
 
ND
ND
एफबीआयने गेल्या महिन्यात अटक केलेल्या पाकिस्तानी वंशाच्या तहव्वूर राणा या कॅनडाच्या नागरिकाच्या घरी ओसामा बिन लादेनसह अनेक दहशतवादी नेत्यांच्या भाषणांच्या सीडी सापडल्या आहेत. राणा आणि त्याचा सहकारी डेव्हिड हेडली यांनी लष्कर ए तोयबाच्या निर्देशावरून भारतात हल्ल्याचा कट आखल्याचा कट एफबीआयने उघडकीस आणला आहे.

अल कायदा या कुख्यात संघटनेचे प्रसारमाध्यम असलेल्या अस सहाब मीडीया यांनी निर्मित केलेल्या या सीडी असून त्यातल्या एका सीडीचे नाव बॉम्बिंग एट डेन्मार्क एम्बसी असे आहे. राणा हा मुळ पाकिस्तानी नागरिक असून तो गेल्या वर्षभरापासून शिकागोत रहात होता. त्याला आणि डेव्हिड हेडली यास गेल्या महिन्यात एफबीआयने शिकागोच्या विमानतळावर अटक केली होती.

दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजसह डेहराडून आणि मसूरी येथील शाळांवर दहशतवादी हल्ले करण्याची त्यांची योजना असल्याचे त्यांच्या चौकशीत उघड झाले होते.

हेडलीने लष्कर ए तोयबाच्या नेत्यांशी भेट घेण्यासाठी पाकिस्तानात अनेक फेर्‍या केल्या होत्या. त्याच्या चौकशीसाठी भारतीय अधिकारी पाकिस्तानात पोहोचले आहेत.
संबंधित माहिती शोधा