आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » कर्नाटकच्‍या 43 भाजप आमदारांचा राजीनामा
Feedback Print Bookmark and Share
 
कर्नाटकातील राजकारण तापत चालले असून एकमेकांविरोधात डावपेच सुरू आहेत. विद्यमान मुख्‍यमंत्री वाय.एस.येदुरप्पा यांचा विरोध करत असलेल्या नाराज 43 आमदारांनी आता राजीनामा अस्‍त्र उगारले असून यामुळे पक्ष नेतृत्व अडचणीत आले आहे.

कर्नाटकाच्‍या 43 नाराज आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे. हैदराबादमध्‍ये या आमदारांनी जनार्दन रेड्डी आणि जगदीश शट्टार यांच्‍याकडे आपला राजीनामा सोपविला. मुख्‍यमंत्री बदलण्‍याची मागणी नाराज आमदारांची असून आता ते पक्ष नेतृत्वावर या कृतीने दबाव टाकत आहेत.

दरम्यान, नाराज आमदारांचे नेतृत्व करीत असलेल्‍या जनार्दन रेड्डी यांनी आपल्‍याला 70 आमदारांचा पाठिंबा असल्‍याचा दावा केला आहे. त्‍यापैकी 47 हैदराबादमध्‍ये आहेत तर उर्वरित मुंबई आणि गोव्‍याला सहलीवर गेले आहेत.
संबंधित माहिती शोधा