आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » महाराष्ट्र माझा » ४८ तास द्या, सरकार बनवतोच - चव्हाण
Feedback Print Bookmark and Share
 
ashok chauwahan
MH News
MHNEWS
युतीने राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केल्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येत्या ४८ तासांमध्ये राज्य सरकार स्थापन करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

निवडणुकांचा निकाल लागल्यापासून मंत्रिपदांवरून राष्ट्रवादी आणि कॉग्रेसमध्ये जुंपली आहे. कोणाला कोणते खाते, यावरून उभय पक्षांचे एकमत न झाल्याने राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे.

या दोन पक्षांच्या भांडणाचा फायदा घेत युतीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींनी त्यांची मागणी फेटाळून लावली नसली तरी ती फारशी गांभीर्यानेही घेतलेली नाही.
udhaav
WD
WD


राज्यात गुप्त खलबतांना उधाण आले असतानाच सरकार नेमके कुणाचे स्थापन होणार असाही प्रश्न विचारला जात आहे. मुंबई पासून ते राज्याच्या काना-कोपऱ्यापर्यंत अफवांना उधाण आले आहे.

या साऱ्या परिस्थितीमुळे राज्याचे नाव खराब झाले आहे. राष्ट्रवादीशी सरकार स्थापने संदर्भात चर्चा सुरू असून, आगामी ४८ तासांमध्ये सरकार स्थापन करीनच असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटल्याने पुन्हा एकदा राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
संबंधित माहिती शोधा