मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटची पहिली बैठक रविवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
राज्याच्या विधानसभेचे मंगळवारपासून तीन दिवसांचे विशेष अधिवेशन होणार असून बुधवारी अध्यक्ष व विरोधी पक्षनेता ठरणार आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या टीममध्ये 38 जणांनी शनिवारी शपथ घेतली. त्यात राष्ट्रवादीचे 20 तर कॉंग्रेसचे 18 मंत्री होते. आता विस्तार इतक्यात होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.