ज्येष्ठ लेखिका आणि पु.ल.देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे (वय 83 ) यांचे शनिवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. 'आहे मनोहर तरी', 'प्रिय जी.ए', 'मण्यांची माळ' या पुस्तकांमुळे त्यांची वेगळी ओळख होती. स्वतंत्र्य शैलीच्या त्या लेखिका होत्या.
'आहे मनोहर तरी हे त्यांचे आत्मचरित्र विशेष गाजले. त्या अनेक सामजिक कार्यातही सक्रीय होत्या. मुक्तांगणसारख्या संस्थांना त्यांची मोठी मदत होती. पु. ल. देशपांडे यांची त्यांना 54 वर्षांची साथ लाभली. पु.ल.च्या जयंतीच्या एकादिवसाअगोरदरच त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल सर्वांना चटका लागला आहे.