| राम आणि कृष्ण भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे केंद्रबिंदू आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणात रामाचे नाव कोरलेले आहे. रामरंगी सगळे रंगले आहेत. राम आहे, म्हणूनच भारतीय जनतेत राम आहे. 'श्री राम जय राम जय जय राम' आणि 'गोपालकृष्ण आणि राधेकृष्ण' या त्यांच्या ह्रदयातून येणार्या घोषणा याच्या साक्षीदार आहेत. प्रत्येकाच्या जीवनात राम एकरूप झालेले असून खेडेगावातील दोन व्यक्तींची गाठभेट झाल्यास ते आदराने हात जोडून 'राम राम' असे म्हणतात. 'राम रखे उसे कौन चाखे' या म्हणीप्रमाणे ईश्वराच्या संरक्षण शक्तीत मानवाचा दृढ विश्वास प्रतिबिंबित होतो. 'राम रखे ऐसे रहो' यात.... |