आपल्या पूर्वजाविषयी कृतज्ञता व श्रद्घा व्यक्त करण्याच्या काळास पितृपंधरवडा किंवा श्राध्दपक्ष असे म्हटले जाते. शुक्रवार, दि.4 सप्टेंबरपासून श्राध्दपक्षास प्रारंभ झाला असून तो 18 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. द्वादशी तिथी नसल्याने यंदा श्राद्घपक्ष सोळा ऐवजी पंधरा दिवसांचा असणार आहे.
पूर्वज तसेच कुलस्वामिनी यांचे आपल्याकडे होणार्या प्रत्येक शुभ कार्यात पुजन केले जात असते. सगळ्यात आधी वरील मंडळींना निमंत्रण दिले जात असते. हिंदू धर्मानुसार शुभ कार्याआधी पितृ श्राद्ध, पितृ तर्पण केले पाहिजे. आपल्या कुटुंबात लग्न अथवा शुभ कार्य निश्चित झाले असेल तर त्याच्या पंधरा दिवस आधी आपल्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान करून त्यांना तृप्त केले पाहिजे