मुख्य पृष्ठ > धर्म > धर्मयात्रा > लेख > अरण्मूल येथील पार्थसारथी मंदिर
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अरण्मूल येथील पार्थसारथी मंदिर
- टी. प्रतापचंद्रन
केरळमधील प्राचीन मंदिरांपैकी अरण्मूल श्री पार्थसारथी मंदिर आहे. श्रीकृष्ण येथे पार्थसारथी रूपात वसले आहेत. पथानमथिट्टा जिल्ह्यात पंबा नदीच्या किनारी हे मंदिर आहे. निशस्त्र कर्णाला मारल्याचे प्रायश्चित्त म्हणून अर्जुनाने हे मंदिर बांधल्याचे मानले जाते.

हे मंदिर मुळात शबरीमाला जवळील नीलकल येथे तयार करण्यात आले. त्यानंतर सहा बांबूंच्या तराफाच्या सहाय्याने ते येथे आणण्यात आले. म्हणूनच या भागाचे नाव अरण्मूल पडले. मल्याळममध्ये याचा अर्थ बांबूचे सहा तुकडे असा होतो.

दरवर्षी भगवान अय्यपा यांचे सुवर्ण अंकी (पवित्र दागिने) येथून शोभायात्रा काढून मिरवत शबरीमलापर्यंत नेले जातात. ओणम या केरळमधील प्रसिद्ध उत्सवादरम्यान अरण्मूल येथे नौकांची शर्यतही आयोजित केली जाते.

dharmayatra
WD
हे मंदिर केरळी वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. पार्थसारथीची मूर्ती सहा फूट उंच आहे. दरवाजांवर अठराव्या शतकातील सुंदर चित्रे आहेत. चार स्तंभावर हे मंदिर उभारले आहे. पूर्वेला असलेल्या स्तंभाजवळून मंदिरात जायला १८ पायर्‍या आहेत. तर मंदिरातून उत्तरेला असलेल्या पंबा नदीवर जाण्यासाठी ५७ पायर्‍या उतराव्या लागतता.

मल्याळम दिनदर्शिकेप्रमाणे मीनम या महिन्यात येथे दहा दिवसांचा मोठा उत्सव असतो. ओणम उत्सव काळात येथे भरणार्‍या नौका शर्यती प्रसिद्ध आहेत. या शर्यतींना अरूण्मला वल्लमकाली असे म्हणतात. वास्तविक या शर्यतीमागेही मोठी परंपरा आहे. या नौकेत तांदूळ व अन्य खाद्यपदार्थ घेऊन ते जवळच्या गावात वाटायची 'मंगद' नावाची ही परंपरा शर्यतीत परिवर्तित झाली आहे. कोडियट्टमने (ध्वजारोहण) प्रारंभ आणि मूर्तीला स्नान घालून या उत्सवाची सागंता होते.

dharmayatra
WD
गरूडवाहन इजुनल्लातू हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. यात शोभायात्रा काढली जाते. भगवान पार्थसारथी यांना गरूडाच्या रथावर बसवून पंबा नदीवर नेले जाते. यावेळी मंदिराला मोठा नजराणा भेट दिला जातो. याशिवाय खांडवनादाहनम नावाचा एक उत्सव धनुस या मल्याळम महिन्यात साजरा केला जातो. यात मंदिराच्या समोर झाडांची पाने, फांद्या यांच्या सहाय्याने जंगल साकारले जाते. मग महाभारतातील खांडववन दहनाचा देखावा साकार केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीही येथे जोरदार साजरी होते.

कसे जाल?

रस्ता मार्ग- पथानमथिट्टा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अरण्मूल सोळा किलोमीटरवर आहे. त्यासाठी बस उपलब्ध आहेत.

रेल्वे मार्ग- चेनगन्नूर हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून १४ किलोमीटरवर अरण्मूल आहे.

हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ कोची आहे. अरण्मूलपासून ते ११० किलोमीटरवर आहे.
व्हिडिओ पाहा
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
दत्तमहाराजांची तपोभूमी - श्री क्षेत्र नृसिंहवाडी  
नांदेडचा सचखंड गुरूद्वारा  
जेजुरीचा खंडोबा  
श्रीकृष्णाचे 'खाटू श्यामजी' रूप  
भारतातील सर्वांत मोठे शनी मंदिर  
शंभर वेळा काशी...एकदा प्रकाशी