डेक्कन चार्जर्सने व रॉयल चॅलेंजर्सचा सहा धावांनी फायनलच्या युध्दात पराभव करून इंडियन प्रिमियर लीगचा दुसरा करंडक पटकावला. डेक्कन चार्जर्सने ठेवलेले 144 धावाचे लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्सला निर्धारित 20 षटकात केवळ 137 धावापर्यंत मजल मारता आली. रॉयल चॅलेंर्जस लक्ष्याचा पिछा करत असताना पंधराव्या ओवरपर्यंत विजयाच्या अगदी जवळ पोहचला होता मात्र निरर्णायक क्षणात साइमंड्सने प्रथम रॉस टेलर (27) व त्यानंतर विराट कोहलीला (7) तंबूत पाठवून डेक्कनला पुन्हा विजयाच्या प्रवाहात आणले. महत्त्वपूर्ण दोन गडी तंबूत परतल्याने रॉयल चॅलेंजर्सचे हातपाय गळाले. त्यानंतर पुढील ओहरमध्ये हरमीत सिंगने रॉयलला आणखी एक मोठा झटका दिला. तो म्हणजे मार्क बाउचर अवघ्या 5 धावावर तंबूत परतला. त्यांनतर रॉयल चॅलेंजर्सकडे विजयासाठी केवळ संघर्ष उरला होता. परंतु शेवटी सहा धावानी जम्बोच्या संघाला पराभव पचवण्याची वेळ आली. रॉबिन उथप्पाने विजयासाठी खूप परिश्रम घेतले परंतु ते निष्फळ ठरले. शेवटी आयपीएलचे दुसरे पर्व हैदराबाद डेक्कन चार्जसने खिशात घातले.तत्पुर्वी- बेंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार अनिल कुंबलेने केलेल्या भेदक गोलंदाजी पुढे गिलीचा डेक्कन चार्जर्स चारीपाय चित झाला. निर्धारीत 20 षटकात केवळ 143 धावाचे आव्हान रॉयलसमोर ठेऊ शकला. साइमंड्स (33), रोहित शर्मा(24) व हर्शल गिब्सचे (53) अर्धशतकच्या योगदानाने गिलीच्या डेक्कन चार्जर्सला जम्बो अनिल कुंबळेच्या रॉयलसमोर विजयासाठी 144 धावाचे लक्ष्य ठेवण्यात यश मिळले. आयपीएलच्या दुसर्या मालिकेच्या फाइनलच्या युध्दात जम्बोच्या रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून गिलीच्या सेनेला फलंदाजीसाठी आवाहन केले. सामना सुरू होताच डेक्कनचा कर्णधार एडम गिलक्रिस्टला खाते न उघडू देता पहिल्या ओवरमध्येच अनिल कुंबलेने त्याचा त्रिफळा उडवून त्याला तंबूत धाडले. 17 व्या ओवरमध्ये डेक्कन चार्जर्स जलद गतीने धावा काढण्याच्या नांदात रोहित शर्मा व वेणुगोपाव राव यांचा त्याग करावा लागला. त्यांना कुंबले सहज बाद केले.डेक्कन चार्जर्सचे तिसरे व्हिकेट सायमंड्सच्या रूपात गेले. सायमंड्सने 21 चेंडूत चार चौकार व एक षटकाच्या मदतीने 33 धावा काढल्या. अनिल कुंबलेला त्याची दांडी गुल करण्याचा चान्स मिळाला. तत्पुर्वी, डेक्कनला दुसरा झटका 18 धावावर टी.एस. सुमनच्या रूपात मिळाला. अवघ्या 10 धावावर विनय कुमारच्या चेंडूवर मनिष पांडेच्या हाती झेल देऊन सुमन मैदानातून चालता झाला. शेवटच्या ओवरमध्ये विनय कुमारने अज़हर बिलखियाला पॉवेलियनचा रस्ता दाखवला. डेक्कन चार्जर्सचा संघाने दिल्ली डेयर डेविल्सचा पराभूत करून फाइनलमध्ये प्रवेश केला, तर रॉयल चॅलेंजर्सने शनिवारी चेन्नई सुपर किंग्जला 'दे धक्का' देऊन आपल्या फायनलच्या मार्गातील पत्ता साफ केला. दोन्ही संघ पहिल्यादा अंतिम फेरीत पोहचले आहेत. गत आयपीएलमध्या डेक्कन चार गुणांनी आठव्या स्थानी होता तर रॉयल चॅलेंजर्सने आठ गुण मिळवून सातव्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले होते.धावफलक पहा. |