डेक्कन चार्जर्स संघाचा कर्णधार एडम गिलक्रिस्ट याला संपूर्ण स्पर्धे दरम्यान उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल 'डीएलएफ गोल्डन प्लेयर ऑफ दी लीग' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आयपीएल दोनच्या अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्सच्या विजयानंतर आयोजित पूरस्कार वितरण समारंभात त्याला हा पुरस्कार देण्यात आला.
अंतिम सामन्यात चार षटकात चार गडी बाद करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार अनिल कुंबळे यालाही सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. |