शेवटच्या पाच षटकांमध्ये आमचा संघ सामना हरला. ताटात विजेतेपद ठेवून ते डेक्कन चार्जर्सला आम्ही बहाल केले, अशी बोचरी टीका रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचे मालक विजय माल्या यांनी आपल्या संघावर केली.
माल्याचा बेंगळुरु संघ अंतिम फेरीत सहा धावांनी पराभूत झाला. त्यानंतर बोलतांना माल्या म्हणाले, 'आमचा संघ अंतिम फेरीत पोहचला याचा आम्हाला अभिमान आहे. पहिल्या 15 षटकांपर्यंत सामना आमच्या हातात होता. परंतु शेवटच्या पाच षटकात आमच्याकडून सामना गेला.' |