रास टेलर आणि विराट कोहली यांना सलग दोन चेंडुंवर बाद करुन एंड्रयू सायमंड्सने आमच्याकडून विजेतेपद पळविले, असे मत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा कर्णधार अनिल कुंबळेने व्यक्त केले.
कुंबळेने सांगितले की, शेवटच्या सामन्यात पराभवाचे दु:ख असतेच. आम्हाला विजेतेपदासाठी मिळालेले 144 धावांचे लक्ष्य अवघड नव्हते. परंतु सायमंड्सने आमच्याकडील विजेतेपद हिसकवून घेतले. त्याने घेतलेल्या दोन बळीनंतर सामन्यावरील आमची पकड गेली.
अंतिम सामन्यात आम्ही पराभूत झालो असलो तरी अंतिम सामन्यापर्यंतचा आमचा प्रवास गौरवास्पद आहे. संघातील सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. परंतु विजेतेपद मिळाले असते तर खूप आनंद झाला असता, असे कुंबळेने सांगितले. |