कॉर्पोरेट जगताला आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपात करावी लगात आहे. आता कर्मचारी कपातीची लोन पाकिस्तान क्रिकेट मंडळातही (पीसीबी) पोहचले आहे. पीसीबी 250 कर्मचार्यांना कमी करणार आहे.
पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलीम अल्ताफ यांनी सांगितले की, पीसीबीमध्ये सध्या 544 कर्मचारी आहेत. यामध्ये कपात करुन खर्चात बचत केली जाणार आहे. यासंदर्भात तीन सदस्यीस समितीची नियुक्ती केली गेली असून ते लवकरच आपला अहवाल पीसीबी अध्यक्ष एजाज बट यांना देणार आहेत. |