मागे झालेल्या चुकांमधून धडा घेतला आणि चतुराईने क्रिकेट खेळलो, असे आपल्या संघाच्या यशाचे राज डेक्कन चार्जर्सचा कर्णधार एडम गिलख्रिस्ट याने उघडले.
गिलख्रिस्टने सांगितले की, ऑस्ट्रेलियाने तीन वेळा विश्वकरंडक मिळविल्यानंतर झालेला आनंद आयपीएलमध्ये आम्ही विजेतेपद मिळविल्यानंतर होत आहे. मागील वर्षाचा अनुभव खूपच दुखदायक होता. परंतु यावर्षी संघातील प्रत्येक खेळाडूने घेतलेले परिश्रम कामी आले. रोहीत शर्मा आणि प्रज्ञान ओझा हे भारतीय क्रिकेटचे धरोहर असल्याचे त्यांनी सिध्द करुन दिले. रोहीत संघाचा उपकर्णधारही होता. त्याचाबरोबर खूप मजा आली. निश्चितच तो एकदिवस भारतीय संघाचा कर्णधार होईल. |