आयपीएलमध्ये अनियमित गोलंदाजांनी मिळविलेल्या यशाचा फायदा भारतीय क्रिकेट संघाला ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत होणार आहे. अनियमित गोलंदाजांच्या यशामुळे भारताची गोलंदाजी भक्कम होईल, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले. धोनीने म्हटले आहे की, आयपीएल खेळणारे माझे सहकारी ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करतील. यामुळे विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद आपल्याकडेच ठेवण्यात आम्हाला यश मिळेल. आयपीएलमुळे भारताला काही अनियमित गोलंदाज मिळाले आहेत, त्यांचा विश्वकरंडक स्पर्धेत फायदा होईल. |