आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नवीन मानांकनात भारताचा गौतम गंभीर तिसर्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत हरभजनसिंह सहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहामध्ये असणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
गौतम गंभीर 847 गुण घेवून तिसर्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर 13 व्या तर व्हि.व्हि.एस. लक्ष्मण 15 व्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवागला 20 वा क्रमांक मिळाला आहे.
गोलंदाजीत हरभजनसिंगनंतर झहीर खान अकराव्या क्रमांकावर आहे. इशांत शर्मा 20 व्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ 117 गुण घेवून तिसर्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 128 गुणांसह पहिल्या तर दक्षिण आफ्रिका 119 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. |