टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर घेतलेल्या वेस्ट इंडीज मालिकेवर भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर याने टीका केली आहे. या प्रकारच्या मालिकेमुळे खेळाडूंना अतिक्रिकेटचा थकवा येत असल्याचे मांजरेकरने सांगितले.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारत लागलीच विडींज दौर्यासाठी रवाना झाला. त्याबद्दल बोलतांना मांजरेकर म्हणाला की, भविष्यात या प्रकारचे दौरे मंडळाने आयोजित करु नये. तसेच सम संख्यांच्या सामन्यांमुळे मालिकेचा निर्णय लागत नाही. याबद्दलही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पावले उचलण्याची गरज आहे. |