पाकिस्तान क्रिकेट मंडळाने वादग्रस्त गोलंदाज महंमद असिफ उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी दहा लाख रुपये दंड केला आहे. यामुळे चॅम्पियन ट्रॉफीत त्याची निवड होण्याची शक्यता आहे.
असिफला दुबई पोलिसांनी उत्तजेक द्रव्यासह पकडले होते. त्यावेळी 19 दिवस तो दुबई पोलिसांच्या ताब्यात होता. आयपीएलच्या पहिल्या सत्रात असिफने बंदी घालण्यात आलेले नॅड्रोलोन हे उत्तेजक घेतल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती. |