पाकिस्तान क्रिकेट मंडळाने अष्टपैलू सोहेल तनवीर याला राजस्थान रॉयल्सकडून खेळण्यास परवानगी दिली आहे. सोमवारी लार्ड्सवर होणारा मिडीलसेक्सविरुद्धच्या सामन्यात तनवीर खेळणार आहे.
आयपीएलच्या पहिल्या सत्रात तनवीर सर्वश्रेष्ठ गोलंदाज ठरला होता. राजस्थान संघाच्या विजेतेपदामध्ये त्याचा महत्वाचा वाटा होता. परंतु मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आयपीएलचे दुसरे सत्र खेळण्याची परवानगी पाकिस्तानी खेळाड़ंना मिळाली नव्हती. आता इंग्लंडमध्ये होणार्या सामन्यात तनवीर खेळणार असल्याने संघ मालक शिल्पा शेट्टी हिने आनंद व्यक्त केला. |