पाकिस्तान आणि श्रीलंके दरम्यान होणार्या पहिल्या कसोटी सामन्यास शनिवारपासून प्रारंभ होत आहे. श्रीलंकेस त्यांच्या मायभूमीत हरविणे पाकिस्तानला अवघड जाणार आहे.
श्रीलंकेच्या खेळाडूंवर पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही संघात पहिलाच सामना होत आहे. या हल्ल्यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले होते. कसोटी सामन्यात सलग दोन शतके ठोकणारा समरवीरा याला गोळ्या लागल्यामुळे तो जखमी झाला होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा याने सांगितले. |