तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवराज सिंगने केलेल्या फलंदाजीच्या जोरावरच भारताला सामना जिंकण्यात यश मिळाल्याचे मत कर्णधार महेंद्र सिंग धोनीने व्यक्त केले आहे. युवराजने टिकून आणि प्रसंगी आक्रमक खेळ केल्यानेच हा सामना भारताने जिंकल्याचे त्याने म्हटले आहे.
फिरोजशहा कोटला मैदानावर फलंदाजी करणे मोठे आव्हान असून, युवराजने आपल्या नैसर्गिक खेळात बदल करून संयमी खेळी केल्यानेच भारताला हे यश मिळाल्याचे धोनी म्हणाला.
दुखापतीतून सावरल्यानंतर युवराजने पुन्हा एकदा यशस्वी पदार्पण केले असून, त्याच्या फॉर्ममध्ये परत आल्याने भारतीय संघ आणखी बलवान झाल्याचे धोनी म्हणाला.