ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » फिरोजशहा कोटला स्टेडियममध्ये जिवंत काडतुसे
Feedback Print Bookmark and Share
 
दिल्लीत फिरोजशहा कोटला स्टेडियमवरील बाथरुममध्ये सात जिवंत काडतुसे सापडली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसर्‍या एकदिवसीय सामना सुरु होण्याच्या दोन तास आधी ही काडतुसे सापडली होती, असा खळबळजनक खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे.सामना सुरू होण्याआधी सुरक्षा तपासणी सुरू असताना काडतुसे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेत दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. सामना सुरू होण्याआधी मैदानाची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार दिल्लीतील सामना सुरू होण्याआधी सुरक्षा पाहणी करण्यात आली. त्यावेळी काडतुसे सापडली होती. यानंतर घबराट उडू नये म्हणून ही माहिती जाहीर करण्यात आले नाही नाही.
संबंधित माहिती शोधा