भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने आपली क्रिकेट कारकीर्द संपली नसल्याचे स्पष्ट केले आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेतून आपण पुनरागमन करु, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
खांद्याच्या दुखापतीमुळे ब्रेट ली याला भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यापूर्वी ऍशेस मालिकेतूनही तो दुखापतीमुळे बाहेर पडला होता. आता 26 नोव्हेंबरपासून सुरु होणार्या विडींज मालिकेत खेळण्याचे लक्ष्य त्याने ठेवले आहे. तो म्हणाला,' माझी क्रिकेट कारकीर्द अजून संपली नाही. तसेच कसोटी क्रिकेट खेळण्याचे महत्वपूर्ण लक्ष्य मी समोर ठेवले आहे. '