धोनीचे अव्वल स्थान कायम

दुबई, सोमवार, 2 नोव्हेंबर 2009( 18:32 IST )
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत नागपूर आणि दिल्ली सामन्यात चांगली फलंदाजी करणार्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नव्या यादीत भारताच्या युवराजसिंगचे दुसरे स्थान मात्र घसरले आहे. त्याला ऑस्ट्रेलियाच्या माईक हसीने मागे टाकले. हसीने पाच वरुन दुसर्या स्थानावर झेप घेतली आहे. युवराजला तिसरा तिसर्या स्थानावर आला आहे. अन्य खेळाडूंच्या यादीत भारताचा सचिन तेंडुलकर नवव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे गौतम गंभीरचो स्थान दोनने सुधारले असून तो चौदाव्या क्रमांकावर आला आहे. तर सेहवाग 12व्या स्थानावर आहे.