आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा गेलची निवड झाली आहे. स्थानीय मीडिया रिपोर्टनुसार गेलच्या निवडी संदर्भात निवड समितीने शिफारस केल्यावरून वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड (डब्ल्यूआयसीबी) बारबडोस येथे एक बैठक झाली. त्यात गेलची निवड झाली. वेतन व कराराच्या मुद्यावरून डब्ल्यूआयसीबी व प्रमुख क्रिकेटपटू यांच्यात वाजले होते. 30 वर्षीय गेलने जुलैपासून एक ही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.