चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 24 धावांनी पराभव करुन मालिकेत पुनरागमनाचे श्रेय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिग याने गोलंदाजांना दिले. 250 धावसंख्या असताना भारतीय फलंदाजांना रोखण्यात गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी मोलाची कामगिरी केली, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिग याने व्यक्त केले.
भारताला विजयासाठी 251 धावांचे लक्ष्य देवून 46.4 षटकात 226 धावांवर रोखले. त्याबद्दल बोलताना पॉंटिग म्हणाला की, आमचे वेगवान गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी अपेक्षा पूर्ण केल्या. मोहाली सारख्या खेळपट्टीवर आम्ही 300 धावा करु शकलो असतो, परंतु फलंदाजांची ही कमतरता गोलंदाजांनी दूर केली. मालिका आता 2-2 ने बरोबरीत आली असून इतर तीन सामनेही महत्वपूर्ण असल्याचे पॉंटिगने सांगितले.