भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहूल द्रवीड याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बळी घेण्यास अपयश आलेल्या प्रवीण कुमारचा बचाव केला असून त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले आहे.
मेरठमध्ये उत्तरप्रदेश संघाविरुद्ध कर्नाटककडून रणजी सामना खेळण्यासाठी आलेल्या द्रविडने सांगितले की, प्रविणकुमारने यापूर्वीच आपली गोलंदाजी चमक दाखविली आहे. त्याच्यात स्विंग करण्याची जबरदस्त क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीचे कौशल्याही कौतुकास्पद असल्याचे त्याने सांगितले.