ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » पीटर सिडल एकदिवसीय मालिकेतून बाहेर
Feedback Print Bookmark and Share
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडल बाहेर पडला आहे. त्याच्या शरिराच्या डाव्या बाजूचे स्नायू आखडल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाला परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मालिकेत ऑस्ट्रे‍लियाला खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी ब्रेट ली, टीम पेन हे ही मालिकेतून बाहेर पडले आहे. सिडल मोहालीत झालेल्या सामन्यात फक्त पाच ओवर टाकू शकला होता. दुखापत झाल्यामुळे त्याला फिजिओथेरपिस्टचे उपचार घेत पॅव्हेलियनमध्ये बसून राहावे लागले. सिडलला काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल, असे ऑस्ट्रेलियाचे फिजिओ केव्हिन सिम्स यांनी सांगितले. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियास परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
संबंधित माहिती शोधा