बांगलादेशने चौथ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बॉब्वेचा पराभव करीत पाच सामन्यांची मालिका जिंकली. झिम्बॉब्वेचा संघ केवळ 44 धावात बाद झाला. एकदिवसीय सामन्यातील ही पाचवी निच्चांक धावसंख्या आहे.
बांगलादेशने 11.5 षटकात 49 धावा करुन पाच सामन्यांची मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. तत्पूर्वी झिम्बॉब्वेचा संघ 24.5 षटकात 44 धावांवर गारद झाला. झिम्बॉब्बेकडून मॅलकम वालेर (13) आणि स्टुअर्ट मैटसिकेनयारी (11) हेच दुहेरी धावसंख्या गाठू शकले.