भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजनसिंग याच्यावर धार्मिक भावना दुखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका स्वंयसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवरुन न्यायालयाने हरभजनला समन्स बजविले आहे.
ग्लोबल ह्यूमन राइट्स काउंसिल (जीएचआरसी) या संस्थेने फौजदारी आणि दिवानी दावा दाखल केला होता. या प्रकरणी फौजदारी दाव्यातून हरभजनला दिलासा मिळाला होता. परंतु दिवानी दाव्याची सुनावणी नऊ डिसेंबर रोजी होणार आहे. भज्जीने समन्स स्वीकारले असून आपण न्यायालयात हजर राहणार असल्याचे सांगितले आहे.