खांद्याच्या दुखापतीमुळे भारत ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार घेणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली पुढील आठवड्यापासून सराव सुरु करणार आहे. तो मेलबर्नमध्ये एका फिजियोथेरापिस्टचा सल्ला घेत आहे.
ब्रेट लीच्या खांद्याचे स्कॅन करण्यात आले आहे. त्याची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पुढील आठवड्यापासून तो गोलंदाजी सुरु करेल, असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला आहे.
भारताविरुद्ध बडोद्यातील सामन्यात ब्रेट ली ची दुखापत समोर आली. या दुखापतीमुळे तो दहा षटके गोलंदाजीही करु शकला नव्हता. तसेच मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली.