ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचव्या एकदिवसीय सामन्यात 17 हजार धावांचा टप्पा पार करून धुवांधार 175 धावा काढणार्या सचिन तेंडुलकरने आपल्या सर्वोत्तम खेळीपैकी ही एक असल्याची प्रतिक्रिया सामन्यानंतर बोलताना दिली. परंतु विजय हातात आला असताना हारणे निराशाजनक असल्याचे त्याने सांगितले.
सामनावीर ठरलेल्या सचिनने 141 चेंडूत धुवांधार 175 धावा केल्या. तो म्हणाला, 'गुरुवारी खेळलेली 175 धावांची खेळी ही निश्चितच माझ्या सर्वश्रेष्ठी खेळीतील ही एक होती. साडेतीनशे धावांच्या आव्हानाचा आमच्यावर सारखा दबाव असताना धावा केल्या. मात्र विजयापर्यंत पोहचून पराभव पत्करावा लागल्यामुळे निराश झालो.'
चौथ्या विकेटसाठी सुरेश रैनाबरोबर झालेल्या 137 धावांच्या भागेदारीबद्दल त्याने रैनाने कौतक केले. तो प्रतिभावंत फलंदाज असून परिस्थितीनुसार त्याने फलंदाजी केली. त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सचिनने सांगितले.