नवी दिल्ली, शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2009( 15:14 IST )
एक दिवसीय क्रिकेटमध्ये 17 हजार धावांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने अभिनंदन केले आहे. सचिनने 20 हजार धावा पूर्ण कराव्यात अशी शुभेच्छाही त्याने दिली.
'सचिन जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळाडू आहे. त्याच्या बरोबर माझ्या खूप आठवणी आहेत. एकदिवसीय सामन्यात अनेक वेळा आम्ही दोघांनी डावाची सुरवात केली आहे. त्याने 17 हजार धावांचा मोठा टप्पा गाठला आहे. धावा कश्या काढायच्या हे सचिनला माहित आहे. एकादा त्याचा जम बसला म्हणजे धावांचे मशीन सुरु होते. त्याने सन 2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत त्याने 20 हजार धावा पूर्ण कराव्यात,' असे गांगुलीने म्हटले.