ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा सामना केवळ तीन धावांनी हरल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने चाणक्य नीतीत आमचा पराभव झाल्याचे सांगितले. विजयासमीप पोहचला असताना भारत हा सामना पराभूत झाला.
ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 351 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. परंतु मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या 175 धावांच्या खेळीमुळे भारत विजयाजवळ पोहचला होता. सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, विहिरीपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. त्यानंतर विहिरीजवळ पोहचल्यावरही पाणी तुम्हाला स्वत:लाच काढावे लागते. आम्ही विजयाचा खूप जवळ पोहचलो. परंतु लक्ष्य प्राप्तासाठी हवे असलेल्या अंतिम प्रयत्नात अपयशी ठरलो.
प्रतिभामध्ये भारतीय संघ कुठेही कमी नाही. परंतु ही एक डोक्याची लढाई आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक मोठा शॉट खेळायचे असतो आणि त्यासाठी तुम्हाला स्वत:ला तयार करायचे असते. कधी कधी असेही होते, तुम्ही लयमध्ये असतात. त्यावेळी मोठ्या शॉटची गरज आहे की नाही हे तुम्हाला कळत नाही.