नवी दिल्ली, शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2009( 17:42 IST )
सचिनची प्रत्येक चांगली खेळी एक नवीन विक्रम घेऊन येते. 17 हजार धावांचा विक्रम करणारा मास्टर ब्लास्टर सचिन आणखी एका विक्रमाचा उंबरठ्यावर उभा आहे. त्यासाठी त्याला फक्त 49 धावांची गरज आहे. 49 धावा करताच सचिनच्या एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट मिळून 30 हजार धावा पूर्ण होणार आहेत.
हैदराबादमधील प्रेक्षकांनी सचिनच्या 17 हजार धावा आणि 175 धावांची धुवांधार खेळी याच देही याच डोळ्यांनी पाहिली. आता गुवाहाटीचे प्रेक्षक त्याच्या 30 हजार धावांचा विक्रमाचे साक्षीदार होऊ शकतात. सचिनचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17, 168 धावा झाल्या आहेत. तर कसोटीत 159 सामन्यात त्याने 12,773 धावा केल्या आहेत. कसोटी आणि एकदिवसीय मिळून 595 आंतरराष्ट्रीय सामने तो खेळला असून त्यात 29,951 धावा त्याने केल्या आहेत.