ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » सचिनचे गावसकरकडून कौतूक
Feedback Print Bookmark and Share
 
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय‍ क्रिकेटमध्ये 17 हजार धावांचा पल्ला गाठल्याबद्दल लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी सचिन तेंडुलकरचे कौतूक केले आहे. हैदराबादमधील सचिनने 175 धावांची केलेली खेळी ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी असल्याचे त्यांनी म्हटले.

गावसकर यांनी सांगितले की, 351 धावांचा पाठलाग करताना दबाव येणे साहजिकच आहे. परंतु सचिनच्या चेहर्‍यावर काही तणाव दिसला नाही. तो आपला नैसर्गिक खेळ करीत राहिला आणि धावा होत राहिला. हैदराबादमधील सामन्यात पुन्हा पूर्वीचा सचिन दिसून आला. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून त्याची खेळी पाहण्याचा सौभाग्य आपणास मिळाल्याचे गावसकर यांनी म्हटले.
संबंधित माहिती शोधा