राजकोट येथे सुरू असलेल्या वरिष्ठ महिला गटाच्या पश्चिम विभागीय साखळी क्रिकेट स्पर्धेतील एकदिवसीय लढतीत मुंबईने महाराष्ट्राचा 82 धावांनी पराभव केला आणि चार गुण मिळविले. कर्णधार सुनेत्रा परांजपेचे अर्धशतक आणि नॅन्सी दारूवालाने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने विजय मिळविला. मुंबईच्या सुनेत्रा परांजपे 67, राजेश्वरी गोयल 37, संगीता परांजपे 36 तर पूनम राऊत 35 धावा केल्या.