जागतिक उद्योगजगताकडून मंदी असल्याचे वावड्या उठविल्या जात आहेत. परंतु विंबल्डन सारख्या स्पर्धा पहिल्यास मंदीची सावलीही दूरदूर पर्यंत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. एंडी मरे चॅम्पियन बनण्याच्या शक्यतेमुळे लांबच्या लांब रांगा लावून जास्त दराने तिकीट दर्शक घेत आहेत.
इंग्लंडच्या नागरिकांना 73 वर्षांनंतर विंबल्डन ट्रॉफी इंग्लंडचा खेळाडू जिंकेल, अशी अपेक्षा आहे. इंटरनेटवरुन होणारी तिकीटांची विक्री तिप्पटीने वाढली आहे. एंडी मरेच्या सामन्यांबाबत नागरिकांमध्ये मोठे आकर्षण आहे. तो जेव्हाही सामना जिंकतो, अंतिम सामन्यांचे तिकीटांच्या दरात वाढ होत आहे. |