अमेरिकेची अग्रमानांकित खेळाडू सेरेना विल्यम्सने एका संघषपूर्ण सेमीफायनल सामन्यात रशियाच्या एलेना देमेंतिएवाचा पराभव करून विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे.
किमान दोन तास 49 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सेरेनाने देमेंतिएवाचा 6-7, 7-5, 8-6 ने पराभव केला असला तरीही त्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली.
देमेंतिएवाने या ताकतवान महिला खेळाडूसमोर सुरूवातीपासूनच मोठे आव्हान उभे केले होते. |