अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकविले. सेरेनाने तिची बहिण व्हिनस विल्यम्सचा पराभव करीत विजेतेपदावर नाव कोरले. सेरेनाचे हे दुसरे डब्ल्यूटीए विजेतेपद आहे.
डेन्मार्कच्या कॅरोलिनने पोट दुखू लागल्यामुळे उपांत्य लढत सोडून दिली. त्यामुळे सेरेनाचा अंतिम फेरीत पोहचली होती. अंतिम फेरीत सेरेनाने व्हिनसचा 6-2, 7-6 असा पराभव केला. सेरेनाने तिसर्या व सातव्या गेममध्ये व्हिनसची सर्व्हिस भेदत पहिला सेट 6-2 असा आरामात जिंकला. परंतु दुसर्या सेटमध्ये व्हिसने आपल्या खेळात सुधारणा केली. टायब्रेकरमध्ये गेलेला हा सेट जिंकून सामना जिंकला.