क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » दिल्ली अर्धमॅरेथॉनमध्ये डेरिबा मर्गाने विजेता
Feedback Print Bookmark and Share
 
गतविजेत्या इथोपियाच्या डेरिबा मर्गाने दिल्ली अर्धमॅरेथॉन स्पर्धा जिंकली, तर महिला गटात विश्वविजेती मॅरी किटानीने बाजी मारली. भारतीय गटात सेनेच्या दिपचंद सहरामने पुरुष गटाचे आणि उत्तर प्रदेशच्या सुकन्या मालीने महिला गटाचे विजेतेपद पटकावले.

गत विजेत्या डे‍रिबाने ५९ मिनिटे ५४ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद राखले. इथिपियाच्या इशेकु वेनदिनुने एक तास आणि २ सेकंद वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. एक तास आणि ४ सेकंदांसह केनियाच्या विल्सन किटसँगला तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. महिला गटामध्ये विश्वविजेत्या मॅरीने इथोपियाच्या धावपटूंचे आव्हान मोडून काढीत एक तास ६ मिनिटे आणि ५४ सेकंद वेळ नोंदवत ही शर्यत जिंकली. इथोपियाच्या आएलु व्युडे (एक तास ७ मिनिटे ५८सेकंद) दुसर्‍या आणि अबेरू केबिडे (१ तास ७ मिनिट ५९ सेकंद) तिसर्‍या स्थानावर राहिला.

भारतीय गटात गेल्या वर्षी तिसर्‍या स्थानावर राहिलेल्या दिपचंदने आपल्या प्रदर्शनात सुधारणा करीत एक तास ४ मिनिटे वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. रेल्वेच्या संतोष कुमारने एक तास पाच मिनिटे आणि दहा सेकंद वेळेत पूर्ण करीत दुसरे स्थान पटकावले. एक तास ५ मिनिटे आणि १८ सेकंदांसह रेल्वेचाच सोजी मॅथ्यूजला तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले.

भारतीय महिला गटात उत्तर प्रदेशचे वर्चस्व राहिले आणि पहिले तीन क्रमांक त्यांनी पटकावले. सुकन्याने एक तास २० मिनिटांची नोंद करीत अव्वल स्थान पटकावले, तर गोरखपूरची अनुराधासिंगने एक तास २२ मिनिटे ७ सेकंद नोंदवत दुसरे स्थान पटकावले. आगराच्या कमलेश बघेलला एक तास २३ मिनिटे आणि ४५ सेकंदांसह तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले.
संबंधित माहिती शोधा