क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » मेरी कोम उपात्यंफेरीत
Feedback Print Bookmark and Share
 
आशियाई इनडोअर गेम्समधील महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मेरी कोम हिने उपांत्य फेरी गाठली. तिने तैवानच्या टिंग लो युएह हिच्यावर 14-9 असा विजय नोंदविला. तसेच 64 किलो गटातून भारताच्या कविता कुमारीने अंतिम, तर 51 किलो गटातून लॉरा छोटो हिने उपांत्य फेरी गाठली.

महिलांच्या 46 किलो गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत मेरी कोम आणि युएह यांच्यात सुरवातीपासूनच चुरस होती. सामन्यात युएहने कडवा प्रतिकार केला. तिसर्‍या फेरीअखेर 9-7 अशी निसटती आघाडी होती. परंतु शेवटच्या फेरीत मेरीने अनुभव पणास लावत पाच गुण मिळवीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: मेरी कोम उपात्यंफेरीत