जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेने (वाडा) अमेरिकेचा दिग्गज खेळाडू आंद्रे आगासी प्रकरणी तपास करण्याची सूचना एटीपीला केली आहे. आंद्रे आगासी याने शक्तिवर्धक औषध घेतल्याची कबूली दिली आहे.
'द टाईम'मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात आगासाने शक्तिवर्धक औषधी घेतल्याची कबूली दिली आहे. 1997मध्ये त्याने त्याच्या मित्रासोबत शक्तीवर्धक औषधाचे सेवन केले होते. त्यामुळेच तो ग्रॅण्डस्लॅम विजेता बनू शकला, असे आगासीने आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
आगासीच्या या कबुलीनंतर 'वाडा'ने पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. यासंदर्भात वाडाने एटीपीला चौकशी करण्याचे पत्र दिले असून त्याची माहिती आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला दिली आहे.