जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिस पटू सेरेना विल्यम्स हिने या हंगामात घसघसीत कमाई केली आहे. स्पर्धेच्या विजेतेपदातून तिला तब्बल 65 लक्ष 45 हजार 586 डॉलर मिळाले आहे. महिला टेनिस संघटनेने सेरेनाची ही विक्रमी कमाई जाहीर केली आहे. सेरेनाने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत 30 दक्षलक्ष डॉलरची कमाई केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच सेरेना विल्यम्सने डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकविले होते. तिने तिची बहिण व्हिनस विल्यम्सचा पराभव करीत विजेतेपदावर नाव कोरले. सेरेनाचे हे दुसरे डब्ल्यूटीए विजेतेपद आहे.