बॅडमिंटनमध्ये इन्टॅननला विजेतेपद

केदाह, मलेशिया, मंगळवार, 3 नोव्हेंबर 2009( 18:37 IST )
जागतिक कुमार बॅडमिंटन स्पर्धेत थायलंडच्या रॅचानोक इन्टॅनन हिने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत विजेतेपद मिळविणारी चौदा वर्षांची इन्टॅनन सर्वात लहान वयाची खेळाडू ठरली आहे.
अंतिम लढतीत इन्टॅननने थायलंडच्याच पोर्नटिप बुराणाप्रासरत्सुकवर 21-15, 21-23, 21-10 असा विजय मिळविला. इन्टॅननला दुसर्याच गेममध्ये विजेतेपद निश्चित करण्याची संधी होती. मात्र पोर्नटिपने 'मॅच पॉइंट' वाचविला आणि सलग तीन गुण घेत दुसर्या गेममध्ये बाजी मारली. त्यानंतर तिसर्या गेममध्ये इन्टॅननने पोर्नटिपला फारशी संधी दिली नाही.