इंग्लंडचा स्टार फुटबॉल खेळाडू डेव्हिड बेकहम यावर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा इटलीच्या एसी मिलानबरोबर खेळणार आहे. यासंदर्भातला करार बेकहम याने केला आहे.
दक्षिण आफ्रिकेत होणार्या जागतिक फुटबॉल स्पर्धेसाठी आपण तयार असल्याचे सांगणारा बेकहम याने मिलानसाठी करार केला आहे. तो म्हणाला,' मिलानमार्फत युरोपात येण्याची चांगली बातमी माझ्यासाठी आहे. माझे लक्ष्य मिलानसाठी सामने जिंकणे असून विश्वकप फुटबॉलसाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याचे आहे.